Onion Farmer Nashik:नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक,संतप्त शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणचे लिलाव बंद
Continues below advertisement
केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी लागू केल्यानं नाशिक जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालीय. जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण सुरु झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करत लिलाव बंद पाडले. अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं. मात्र पुढच्या काही दिवसांत पुन्हा एकदा कांद्याची आवक वाढणार होती. त्यामुळे कांद्याचे दर स्थिर राहीले असते. मात्र केंद्र सरकारने व्यापारी आणि शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता 31 मार्च पर्यंत निर्यात बंदी केल्यानं नाशिकमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.
Continues below advertisement