Nashik Onion Issue : मंत्री गिरीश महाजन लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये दाखल
मंत्री गिरीश महाजन लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये दाखल झालेत. कांद्याच्या मुद्द्यावरुन मंत्री गिरीश महाजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. तसंच या भेटींमधून नाशिकमध्ये शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. कांद्यावरील निर्यातशुल्काचा निर्णय मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीये. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघणार का हेही पाहाणं महत्त्वाचं असणारेय.