Nashik Onion : नाशकातील कांदा लिलावाचा तिढा तब्बल तीन दिवसांनंतर सुटला, पण पुन्हा लिलाव बंदच
आधी कांद्याच्या निर्यातशुल्कात वाढ करण्यात आली, मात्र, त्यानंतर झालेला आंदोलनांचा उद्रेक पाहता, नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला... पण, शेतकऱ्यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलावाचा तिढा तब्बल तीन दिवसांनंतर सुटला खरा, पण कांद्याचे लिलाव सुरू होताच भाव कमी मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी लिलाव बंद पाडले. लासलगाव, चांदवड, उमराणे, येवला आणि पिंपळगाव बाजार समित्यांमधील लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. कांद्याला अवघा दीड ते दोन हजारांचा भाव मिळत असल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झालेत. कांद्याला योग्य भाव मिळत नाहीये, नाफेडचे अधिकारी देखील उपस्थित नाहीत, अशी तक्रार कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
Tags :
Govt Decision Withdrawal Onion Auction Farmers Angry NAFED Onion Purchase Export Duty Eruption Of Protests