गोरगरीब शेतकऱ्यांच्या योजना सधन शेतकऱ्यांनीच लाटल्या; 11 हजार सधन शेतकऱ्यांकडून PM Kisan योजनेचा लाभ

Continues below advertisement

नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस शेतकऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारल्यानं शेतकरी संघटनाही नाराज आहे.

माहितीनुसार गोरगरीब शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ सधन आणि टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केल्याचं लक्षात आलं होतं. एकट्या नाशिक जिल्ह्यात 11 हजार अशा शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेवर डल्ला मारला.  त्यातल्या अनेकांना नोटिसा बजावल्या आहेत. शासनाची फसवणूक करुन लाटलेले पैसे परत करा अन्यथा गुन्हे दाखल करु असा दम जिल्हाधिकाऱ्यांनी भरला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram