Nashik : लस न घेतलेल्या लोकप्रतिनिधींना सरकारी कार्यालयात 'नो एन्ट्री' ABP Majha
Continues below advertisement
फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यानं शंभर टक्के लसीकरणाचं टार्गेट ठेवलंय. ते लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊनच आता नाशिक जिल्हा प्रशासनानं लसीकरणासाठी सक्तीचे उपाय योजण्यास सुरुवात केलेय. त्यानुकास आजपासून दुकानं हॉटेल्समध्ये ग्राहकांना प्रवेश देण्यापूर्वी लसीकरणांच प्रमाणपत्र बंधनकरण्यात आलंय. तसंच ज्या लोकप्रतिनिधींनी लस घेतलेली नाही अशांना सरकारी कार्यालयात नो एन्ट्री करण्यात आलेय. हॉटेल्स आणि दुकानात लसीकरणाच्या केलेल्या सक्तीला व्यापऱ्यांनी मात्र विरोध केलाय. या निर्णयामुळे आता वाद होण्याचीही शक्यता आहे.
Continues below advertisement