Nashik : निफाडमध्ये यंदा सर्वात कमी तापमान, पारा 4.5 सेल्सिअसवर; शेतकऱ्यांना मोठा फटका

नाशिकमध्ये किमान तापमानात अचानक घट झालीय. निफाडमध्ये पारा 5 अंश सेल्सिअस पर्यंत येऊन पोहोचल्याने बळीराजा समोर मोठं संकट उभं राहीलय. या कडाक्याच्या थंडीचा द्राक्षांवर मोठा परिणाम होणार असून मणीना तडे जाण्यासोबतच फुगवणी थांबणार आहे. या बागा वाचविण्यासाठी बळीराजा भल्या पहाटेपासून बागांमध्ये गवत जाळत शेकोटी करून मणींना ऊब देतायत. पुढील काही दिवसात पारा अजून घसरेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेल्याने बळीराजासाठी हा कसोटीचा काळ असणार आहे. दरम्यान निफाड मधील एका द्राक्षबागेतून याच सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola