Nashik News : नोकर भरती प्रकरणात शासनाची फसवणूक, 14 जणांवर गुन्हा
Continues below advertisement
एका महिलेच्या नोकरभरती प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १४ जणांवर नाशिकच्या सातपूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर आणि सध्याचे उप शिक्षणाधिकारी उदय देवरे, लाभ घेणाऱ्या महिलेसह १४ जणांवर गुन्हा दाखल झालाय. सातपूर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या अध्यक्षांनी ही तक्रार दिलीय.
Continues below advertisement