Nashik : नाशिकच्या नवश्या गणपती मंदिराच्या जमिनीवर कब्जा?
नाशिकच्या गंगापूर रोडवरील प्रसिद्ध नवश्या गणपती बाप्पाची जमीनीवर अतिक्रमण होतंय., तिथे लँड जिहाद होते आहे असा आरोप हिंदू हुंकार सभेत काल सुरेश चव्हाणके यांनी केला होता.. हे अतिक्रमण काढले जावे अशी त्यांची मागणी आहे. सध्या चव्हाणके आणि हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मंदिरात दाखल झाले आहेत.. तिथं चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवश्या गणपती मंदिराला लागूनच असलेल्या दर्ग्याचं अवैध बांधकाम पाडण्यात यावं, अशी या संघटनांची मागणी आहे.