Nashik : नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम, BJP, NCP च्या तुलनेत Shiv Sena चे झेंडे जास्त
धुळ्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे झेंडे न लावल्याने अजितदादांनी भर भाषणात नाराजी व्यक्त केली होती.. दरम्यान आता उद्या नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे मात्र आता वेगळंच चित्र बघायला मिळतय. शहरातील ज्या डोंगरे वसतीगृह मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे त्या मैदानाबाहेर मोठ्या प्रमाणावर होर्डिंग आणि झेंडे लावण्यात आले आहेत मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे अधिक झेंडे सर्वत्र झळकतायत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.. पाहुया...