Nashik Namami Goda : नाशिकमध्ये नमामी गोदा प्रकल्प राबवणार ; ABP Majha
Continues below advertisement
नाशिकच्या गोदावरी नदीचं शुद्धीकरण आणि सुशोभीकरण यासाठी १८४२ कोटी रुपयांचा नमामी गोदा प्रकल्प महापालिकेनं तयार केलाय. नमानी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला असून महापालिकेच्या अगामी निवडणुकीसाठी हा बूस्टर डोस ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. १८४२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढच्या कुंभमेळ्याआधी पूर्ण करण्याचं उद्दीष्ट असून त्यात गोदावरीच्या काठावर सुशोभीकरण, उपनद्या प्रदूषणमुक्त करणं आणि मलनिस्सारण केंद्राची उभारणी अशी अनेक विकासकामांचा समावेश आहे.
Continues below advertisement