MNS MahaMorcha | हनुमानाचं दर्शन घेऊन नाशिकवरून मनसैनिक मुंबईकडे रवाना | ABP Majha
मोर्चात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रकं वाटत आहेत. लोकांना मोर्च्यात सामील होण्याचं आवाहन केलं जातं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी प्रत्य़ेक चौकात बूथ तयार केले आहेत. मोर्चा कसा निघणार याची माहिती ते लोकांना देत आहेत. फिरत्या गाड्यांमधूनही लोकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं जात आहे. मनसेच्या मोर्च्यासाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी शर्ट छापण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी कुर्तेही तयार करण्यात आले आहेत. रिस्ट बँडही तयार करण्यात आले आहेत. उद्याच्या मोर्च्यात मनसैनिकांच्या डोक्यावर गांधी टोपी दिसणार आहे. भगव्या रंगातल्या या टोपीवर राजमुद्रा आणि मनसेची निशाणी छापण्यात आली आहे.