coronavirus | रस्त्यावर मिळणारं मास्क कितपत सुरक्षित? नाशिकमध्ये रस्त्यावर 30 रुपयांत मास्क!
नाशिक जिल्हा रुग्णालयात मास्कचा तुटवडा जाणवतोय, रुग्णावर उपचार करणाऱ्या तिथल्या डॉक्तरांसह परिचारिकांना मास्क मिळत नाहीये मात्र दुसरीकडे अक्षरशः रस्त्यावर मास्कची विक्री होतांना बघायला मिळते आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांकडून मास्कची मागणी वाढली आहे, शहरातील अनेक मेडिकलमध्येही मास्क उपलब्ध नसल्यामुळे शालिमारच्या या विक्रेत्यांकडे ग्राहक मास्क खरेदीसाठी गर्दी करताय. 30 रुपयांत हे मास्क मिळतायेत. हे मास्क वापरणं कितपत सुरक्षित आहे ? मेडिकल मध्ये मास्क उपलब्ध नसतांना या विक्रेत्यांनी हे मास्क कुठून आणले ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे