Coronavirus | नाशिकमध्ये भुजबळांच्या निवासस्थान भागात कोरोनाचा रुग्ण, 3 किमी परिसर सील
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानापासून एक दीड किलोमीटर अंतरावर एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यानंतर मनोहर नगर, गोविंदनगरपासून तीन किमी परिसर सील करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी या परिसराला भेट दिली असून मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारीही इथे उपस्थित आहेत. परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.