Nashik Malls Open | नाशिकमध्ये खबरदारी घेऊन चार महिन्यांनी मॉल्स खुले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बंद असलेले नाशिकमधिल मॉल्स बुधवारपासून पुन्हा सुरु झाले आहेत. मॉल प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली जात असून गर्दी टाळण्यासाठी शहरातील 5 मॉल्सपैकी सर्वात मोठा मॉल म्हणून ओळख असलेल्या सिटी सेंटर मॉलने प्री बुकिंग ऍप विकसित केले आहे. यासोबतच सर्व प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंगद्वारे ग्राहकांची तपासणी केली जात असून पेडल सॅनिटायझरही उभारण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंगसाठी जागोजागी चौकोनही तयार करण्यात आले आहेत. लिफ्टमध्ये फक्त 4 जणांना प्रवेश दिला जात असून एस्कलेटरवरही विशेष खबरदारी घेतली जाते आहे. दर एक तासांनी प्रत्येक शॉप सॅनेटाईज केले जात असून कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेतली जाते आहे. मॉल्समधील मल्टीप्लेक्स, गेम झोन आणि रेस्टॉरंट मात्र अद्याप बंद असून ते कधी सुरु होतील याची आता प्रतीक्षा आहे.