Nashik Accident | मालेगाव-देवळा मार्गावर एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 20 जणांचा मृत्यू | ABP Majha
नाशिकमध्ये एसटी बस आणि रिक्षामध्ये झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. मालेगाव-देवळा रोडवरील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर एसटी बस आणि रिक्षा दोन्ही वाहनं थेट विहिरीत कोसळली होती. विहिरीत पडलेली एसटी बस बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.