Nashik : महायुतीच्या दोन्ही पक्षांत होर्डिंग वॉर, फरांदेंच्या मतदारसंघात अजित पवार गटाचे होर्डिंग्ज
Nashik : महायुतीच्या दोन्ही पक्षांत होर्डिंग वॉर, फरांदेंच्या मतदारसंघात अजित पवार गटाचे होर्डिंग्ज
महायुतीच्या नेत्यांमध्ये आतापासूनच विधानसभा मतदारसंघावरुन रस्सीखेच सुरु झालीय. सलग दोन वेळा नाशिक मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचे भावी आमदार या मजकुरासह होर्डिंग्ज लागल्याने चर्चांना उधाण आलंय. रंजन ठाकरे यांच्या होर्डिंग्जसमोरच देवयानी फरांदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावण्यात आल्याने महायुतीच्या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये होर्डिंग्ज वॉर बघायला मिळत आहे. आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी