Nashik : झणझणीत मिसळसोबत निवडणुकीच्या गप्पा; नाशिकची जागा कुणाला सुटणार ?
Nashik : झणझणीत मिसळसोबत निवडणुकीच्या गप्पा; नाशिकची जागा कुणाला सुटणार ? नाशिकच्या जागेवरून सध्या महायुतीत तिढा कायम आहे. नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार की भाजप, राष्ट्रवादीकडे जाणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलय तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखिल नाशिकसाठी ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आल्याने ठाकरे गटात देखिल नाराजी पसरली आहे. एकंदरीतच मिसळ हब म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या प्रत्येक मिसळ हॉटेलमध्ये देखिल याच विषयावर सर्व राजकीय गप्पा रंगलेल्या बघायला मिळतायत. दरम्यान सध्याच्या या राजकीय घडामोडींबाबत मिसळप्रेमींना काय वाटतंय बघुयात..