Nashik Lok Sabha Election : नाशिकच्या जागेवर शिवसेना, भाजपचा दावा, नाशिकची जागा शिवसेनेला सुटणार?

Continues below advertisement

नाशिकच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.. कारण नाशिकच्या जागेसाठी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केलीये. ज्याला भाजपकडून विरोधा होतोय.. गोडसेंनी युतीधर्म पाळला नाही, भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचाही आरोप भाजपकडून केला जातोय..एकुणच काय तर नाशिकच्या जागेवरुन शिवसेना आणि भाजप दोन्हीकडून दावा केला जातोय. शिवसेनेकडून भौगोलिक परिस्थिती नुसार यादयांचे वर्गीकरण करून कामाचं वाटप केलं जातंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram