Nashik Lok Sabha Election : शांतिगिरी महाराज नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक

Continues below advertisement

Nashik Lok Sabha Election :  शांतिगिरी महाराज नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काल रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बैठकीच्या वेळी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मंत्री भागवत कराड उपस्थित होते. नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. विद्यमान खासदार हेंमत गोडसे तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा तयारीत आहेत. मात्र शिवसेनेसह भाजपमधूनही हेमंत गोडसे यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी  वाढत आहे, त्यामुळे हेंमत गोडसे यांना पर्याय शोधला जात आहे. नाशिकची जागा शिवसेनाला सुटली तर शांतिगिरी महाराज उमेदवार असू शकतात, त्याला भाजपचाही पाठिंबा असू शकतो अशी सध्या नाशिकमध्ये चर्चा आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram