Nashik Kalaram Mandir :राज्यातील मंदिरातील ब्राह्मण पुजारी हटवा,मराठा सेवा संघाचे अध्यक्षांची मागणी
नाशिक येथील काळाराम मंदिर प्रकरणाचा मुद्दा उफाळून आल्यानंतर राज्यात आता आणखी एका मागणीने जोर धरलाय. सगळ्या मंदिरातील ब्राह्मण पूजारी हटवावेत अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलीये... काळाराम मंदिरात घडलेल्या प्रकाराचा मराठा सेवा संघाने तीव्र निषेध केला आहे. या प्रकारानंतर आता राज्यातील मंदिरे भटमुक्त करण्याची वेळ आली आहे, असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलंय. तसंच मराठा सेवा संघ राज्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.