Nashik Kalaram Mandir Aarti Uddhav Thackeray : काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं दर्शन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Kalaram Mandir Aarti Uddhav Thackeray : काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं दर्शन
Uddhav Thackeray Kalaram Mandir visit नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन (State level convention) आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून दुपारी 12 वाजता नाशिकला दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी प्रथम भगूर येथे जात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट दिली आणि सावरकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या राम मंदिरात आज आरती केली. तर उद्धव ठाकरेंनी नाशिकला काळाराम मंदिराला भेट देऊन आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.