Nashik IT Raid : नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे छापे ABP Majha
Nashik IT Raid : नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचे छापे ABP Majha
आयकर विभागाची नाशिकच्या बांधकाम व्यवसायिकवरील कारवाई सलग तिसऱ्या दिवशींही सुरूच आहे. कोट्यवधी रुपयांचे हिशोब तपासले जात असून कागदपत्रे, फाईल्स तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. यात मोठे घबाड हाती लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गुरुवारी सकाळी नाशिकमध्ये एकाच वेळी आयकर विभागाच्या माध्यमातून 20 हुन अधिक ठिकाणी कारवाई सुरू झाली होती, त्यातील काही बांधकाम व्यावसायिकाकडे आजही कारवाई सुरूच आहे.