Nashik IT Hub: नाशिक आयटी पार्कवर केंद्राचं शिक्कामोर्तब, प्रकल्पावरुन नेत्यांमध्ये राजकारण ABP Majha
सत्ताधारी भाजपचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या आयटी पार्क ला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र सरकाकडून ही पाठबळ दिले जात आहे, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्यां नेतृत्वाखालिल शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत पाठपुरावा केला होता त्यानंतर केंद्राच्या लघु उद्योग मंत्रालयाने प्रकल्पावर शिक्कामोर्तब करत प्रकल्पाल पाठबळ देत जलद काम करण्याच्या दृष्टीने स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याचा सूचना दिल्यात, आडगाव शिवारात 10 एकर जागेवर it पार्क उभारण्यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकममध्ये 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय, यात रस्ते पाणी, मूलभूत सुविधा तयार केल्या जाणार आहेत, नाशिक मनपा क्षेत्रातील आयटी कम्पनीना सवलती मिळत नाही, नाशिकच्या तरुणांना मुंबई पुण्याची वाट धरावी लागते त्यामुळे आय टी हब तयार करण्याचे प्रयत्न असल्याचा सत्ताधारी भाजपचा दावा आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आहे हा मास्टर स्ट्रोक दिल्यानं विरोधकांनी निवडणुकीचे गाजर म्हणून यावर टीका करण्यास सुरुवात केलीय. काही ठरावीक खाजगी विकासकांच्या फायद्यासाठी घाट घातला जात असल्याचा आरोप होतोय.