Nashik Rain : नाशिकवरदेखील दुष्काळाचं सावट,सिन्नरमधील 41 गावांमध्ये पेरणी नाही : ABP Majha

नाशिक जिल्ह्यावर देखील दुष्काळचं सावट आहे. सिन्नर तालुक्यातील 41 गावात अद्याप पेरणीही झाली नाही, तर जिल्ह्यातील इतर भागात पिकं  करपण्यास सुरवात झालीये.. तर 44 महसुली मंडळं अशी आहेत ज्या भागात गेल्या 21 दिवसापासून एक थेंबही पाऊस झालेला नाही, त्यामुळे नजीकच्या भविष्यात शेती पिकांसह जनावरच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 56 टक्के पाऊस झाला असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ 77 टक्के आहे.  त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola