Nashik : आठ महिन्याच्या बाळानं गिळलं नेलकटर, शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी वाचवले प्राण
आठ महिन्याच्या बाळाने खेळता खेळता नेलकटर गिळल्याची घटना काल नाशिकरोड परिसरात घडली. ही गोष्ट लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढलं. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.