Nashik : नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या अडचणीत वाढ, गोदाआरतीच्या वादाला आता नवं वळण ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या अडचणीत वाढ, गोदाआरतीच्या वादाला आता नवं वळण ABP Majha
नाशिकच्या रामकुंडावरील गोदा आरतीवरुन पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीमध्ये सुरु असलेल्या वादात आता पुरोहित संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पुरोहित संघाच्या ताब्यात असलेलं वस्त्रांतरगृह म्हणजेच चेंजिंग रुम ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिकाकडून सुरू झाल्यात. आता पोलीस बंदोबस्तात या वस्त्रांतर गृहाचा ताबा येत्या काही दिवसांत घेतला जाणार आहे. पुरोहित संघाच्या वतीने वस्त्रांतरगृहाचा अनधिकृतपणे वापर सुरू असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महापालिकाने कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली होती. दरम्यान या कारवाईत पुढे काय होईल याकडे आता लक्ष लागलंय.