Nashik Igatpuri Water Crisis : धरण उशाला, कोरड घशाला; हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात
धरण उशाशी अन् कोरड घशाशी अशी मराठीत म्हण आहे.. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत दर उन्हाळ्यात याचा प्रत्यय येतो.. हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात वणवण करावी लागते.. एक हंडा भरण्यासाठी पाऊण तास थांबावं लागतं.. वन्य प्राण्यांचा धोका पत्करून महिला पाण्यासाठी बाहेर पडतात..(( प्राण्यांनी हल्ला करू नये म्हणून समूहाने येतात, आणि सोबत जातात.)) खरंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक धरणाचा आणि मुसळधार पर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून इगतपुरीची ओळख. पण भावली धरणापासून 6 ते 7 किलोमीटरवर कुरुंगवाडी नावाचं गाव आहे.. गावातील मारोतीवाडी वस्तीत पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये.. कृषी विभागाच्या बिरसा मुंडा योजने अंतर्गत गावात दोन विहिरी बांधण्यात आल्या. मात्र त्याचे पाणी पिण्याजोगं नाही, पाणी प्यायल्याने घशाला त्रास होतो, लहान मुले आजारी पडतात अशी ग्रामस्थांची तक्रार आहे..