Nashik Igatpuri Jindal Company Fire : नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आगीवरुन अनेक प्रश्नांचा धूर
नाशिकच्या इगतपुरीतील जिंदाल कंपनीची आग आता विझली असली तरी, अनेक प्रश्नांचा धूर आता निघू लागलाय. कंपनीत आग लागली त्या वेळी नेमके किती कर्मचारी हजर होते याची माहिती आता कंपनीने दिलीय. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या सांगण्यास एवढा विलंब का झाला?, असे प्रश्न आता उपस्थित केले जातायत. त्याचसोबत जिंदाल कंपनीतील आगीच्या घटनेनंतर उद्योगांच्या फायर सेफ्टीचाही मुद्दा ऐरणीवर आलाय. दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते जिंदाल कंपनीला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.