Nashik Grapes : अवकाळी द्राक्षांना फटका, रद्दी पेपरपेक्षाही द्राक्षांना कवडीमोल भाव : ABP Majha

राज्यातील अवकाळी पावसामुळे सोन्यासारख्या पिकांची माती झालीए... नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय... टपोरी द्राक्ष आणि संत्री बागा उद्ध्वस्त झाल्यात....  पावसामुळे द्राक्षासह शेतीमालाचं अतोनात नुकसान झालंय...रद्दी पेपरपेक्षाही द्राक्षांना कवडीमोल भाव मिळत असल्याचं चित्र आहे... एकीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झालाय तर  जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर आहेत, त्यामुळे पंचनामे कधी होणार आणि नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.. 
तिकडे नागपूर जिल्ह्यात काल जोरदार गारपीट झाली... शेतकऱ्यांच्या नुकसानाचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत... शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola