साडेतीन किमीचा गाळ काढण्यासाठी गोदावरीचं पाणी रोखलं, पुढील चार महिने सुरू राहणार गाळ काढण्याचं काम
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी आणि कायमच प्रदूषणामुळे चर्चेत राहणाऱ्या गोदावरीच पात्र पूर्णपणे कोरडठाक पडलंय. स्मार्टसिटी अंतर्गत गोदावरी नदी पात्रातील गाळ कढण्याचं काम हाती घेण्यात आलं असून पुढील तीन-चार महिन्यात नदीचं खोलीकरण केलं जाणार आहे. पावसाळ्याचे चार पाच महिने सोडले तर उर्वरित काळ गोदावरी नदी परावलंबी होते. प्रदूषणांत प्रचंड वाढ होते, त्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या कामाने गोदावरीची प्रदूषणाच्या संकटातून काही प्रमाणात सुटका तर होणार आहेच शिवाय प्रोजेक्ट गोदा अंतर्गत गोदाकाठ सुशोभीकरणवरही भर दिला जाणार आहे.
Tags :
Godavari Water River Nashik Dam Gangapur Dam Nashik Rain Water Pollution Godavari River Monsoon Nashik