Nashik Gangapur Dam : नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला, गोदावरीची पातळी कमी होणार
Continues below advertisement
नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी.... नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग थांबवण्यात आलाय. ११ जुलैलाल गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु करण्यात आला. १५ दिवसांनंतर हा विसर्ग थांबवण्यात आला असून गोदावरीची पातळी कमी होणार आहे. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा ६८ टक्क्यांवर गेलाय. जिल्ह्यातील सर्व धरणं तुडुंब भरली असून दहा धरणं ओव्हरफ्लो झालीत. जिल्ह्यातील २४ धरणांचा एकूण पाणीसाठा ८३ टक्क्यांवर गेला. गेल्या वर्षी याच कालावधीत हाच पाणीसाठा ४५ टक्के इतका होता..
Continues below advertisement