Nashik : ...तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार! नाशिकमधील आंदोलक शेतकऱ्यांचा इशारा ABP Majha

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असणाऱ्या किसान सभेच्या बिऱ्हाड मोर्चा बाबत आज महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहेत. मोर्चाच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील गिरिश महाजन, दादा भुसे, शंभूराज देसाई, आदी मत्र्यांसोबत बैठक झाली. बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. या आधी ज्या मागण्या होत्या त्याच मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारात तत्काळ अंमलबजावणी करण्याचा सूचना दिल्या आहेत, वनपट्या संदर्भात दर 15 दिवसांनी बैठक घेऊन त्याचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलनकर्तेच समधान झालय. मात्र जोपर्यंत अंमलबजावणीला सुरवात होणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे, शुक्रवारी झालेल्या बैठकीत काय ठरले कुठल्या मागणी बाबत बैठकीत काय चर्चा झाली, त्याची पूर्तता कधी आणि कशी करणार या विषयी  आंदोलकांना जिल्हाधिकारी माहिती देणार आहेत. त्यानंतर मोर्चा संदर्भात एकमुखाने निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या सहा दिवसापासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन सुरू असून आज समारोप होण्याची शक्यता आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola