Nashik Farmers Loss : Winter Session मध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, सत्ताधारी आमदारांची मागणी
Nashik Farmers Loss : Winter Session मध्ये शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, सत्ताधारी आमदारांची मागणी
नाशिक जिल्ह्यातील अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने नाशिक शहरासह ग्रामीण भागात भव्य मोर्चे काढून सरकारला हिवाळी अधिवेशनात घेरण्याचा तयारी सुरु केलीय. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची मागणी केली आहे. एनडीआरएफप्रमाणेच राज्य सरकारने निकषांत बदल करावे अशी मागणी करण्यात केली जात आहे. अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी खास बाब म्हणून सरकारकडून भरीव मदत दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.