Nashik Electricity Bill : वीजबिल भरलं नाहीतर ऐन दिवाळीत अंधार, महावितरणकडून कारवाईच्या इशाऱ्याचा शॉक
Nashik Electricity Bill : नाशिककरांनी चालू महिन्याचं बिल तसंच थकीत वीज बिल भरलं नाही तर ऐन दिवाळीत घरात अंधार होण्याची शक्यता आहे. कारण महावितरण ग्राहकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना कारवाईच्या इशाऱ्याचा शॉकही दिला आहे.. विशेष म्हणजे दिवाळीत अखंड वीजपुरवठा करण्याच्या सूचना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी दिल्या होत्या मात्र महावितरणनं बिल थकवणाऱ्यांना वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिलाय