Nashik Eid Banner : नाशिक ऐवजी गुलशनाबाद नावाचा उल्लेख, ईदच्या शुभेच्छांच्या पोस्टरमुळे नवा वाद
Continues below advertisement
Nashik Eid Banner : नाशिक ऐवजी गुलशनाबाद नावाचा उल्लेख, ईदच्या शुभेच्छांच्या पोस्टरमुळे नवा वाद
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात गुलशनाबाद नावाचे फलक झळकवण्यात आले होते. बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर नाशिक ऐवजी शहराचा गुलशनाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. मुघलकाळात नाशिकला गुलशनाबाद म्हणतं. नाशिकमधील सारडा सर्कल परिसरात एका फ्रेंड सर्कलने दिलेल्या शुभेच्छा फलकावर गुलशनाबाद असा उल्लेख होता. मात्र, संध्याकाळनंतर हे बॅनर अचानक गायब झाले. दरम्यान या पोस्टरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement