Nashik Infant Death Case : मविप्र रुग्णालयात डॉक्टरांकडून बाळ पडल्याचा आरोप, बाळाची आई काय म्हणते?

Continues below advertisement

नाशिकच्या आडगाव परिसरातील नामांकित मराठा विद्याप्रसारक समाज रुग्णालय आणि महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालक दगावल्याचा गंभीर आरोप एका कुटुंबियांकडून करण्यात आलाय. २ ऑक्टोबर रोजी सकाळी जेलरोड परिसरात राहणाऱ्या फाल्गुनी जाधव या महिलेला प्रसूतीसाठी मराठा विद्याप्रसारक समाज रुग्णालय आणि महाविद्यालयात दाखल केले होते. सायंकाळी महिलेची प्रसूती तर झाली मात्र बाळ वाचू शकले नाही. दरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ खाली पडून जखमी झाल्याने बाळाचा मृत्यू झाला, तसंच शस्त्रक्रियेनंतर दोन तास आम्हाला काहीही माहिती देण्यात आली नाही, उपचाराबाबत कुठलीही कागदपत्रही दाखवण्यात आली नाहीत, असाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आडगाव पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करत व्हिसेरा राखून ठेवला आहे. पोलिसांच्या तपासात काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram