Nashik : देवगाव आश्रमशाळेतील मासिक पाळीप्रकरणी नवी खुलासा ABP Majha

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवगाव आश्रमशाळेची चौकशी पूर्ण झालीय.  मासिक पाळी प्रकरणाला धक्कादायक वळण प्राप्त झालंय, वृक्षारोपणच्या दिवशी मुलगी गैरहजर असल्याच चौकशी अहवालात नमूद कऱण्यात आलंय त्रंबकेश्वर तालुक्यातील देवगावच्या आदिवासी आश्रमशाळेत 12 वित शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वर्ग शिक्षकावर गंभीर आरोप केले होते, मासिक पाळी असताना वृक्षारोपण केल्यानं झाडी मरतात असे सांगून वृक्षारोपण पासून रोखल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाने प्रकल्प अधिकारीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती त्याचा अहवाल प्राप्त झाला।असून विद्यार्थिनीने बनाव केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय, विद्यार्थिनी कायम गैरहजर राहते,यासंदर्भात तिच्या पालकांनी ही विचारणा करण्यात आली होती मात्र शिक्षकांकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईच्या भीतीने विद्यार्थिनी ने बनाव रचल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय, 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola