Nashik : नाशिकच्या देवळा जळीतकांड प्रकरण, तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या देवळा जळीतकांड प्रकरणी गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलीय. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गोरख बच्छावचा मृत्यू झालाय. शुक्रवारी प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाने गोरखला मारहाण करत पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गोरखला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी तरुणी, तिचे आईवडील आणि दोन भावांना अटक केलीय.. देवळा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.