Nashik Dam : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील पाणीसाठा 81 टक्क्यांवर ABP Majha
Continues below advertisement
नाशिकवर वरुणराजाची कृपादृष्टी झालीय. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्याचा पाणीसाठा ८१ टक्क्यांवर गेलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल ५२ टक्क्यांनी वाढलाय. जिल्ह्यातील २३ पैकी १० धरणं ओव्हरफ्लो झालीत. उर्वरित १३ धरणांचा जलसाठा ५० टक्क्यांवर आहे. गंगापूर धरणही ६५ टक्के भरल्याने नाशिककरांवरील पाणीकपातीचं संकट दूर झालंय. विशेष म्हणजे नाशिकहून जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत २९.१०९ टीएमसी एवढे पाणी झेपावल्याने जायकवाडी धरण ७५ टक्के भरलय त्यामुळे येत्या काळात मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जायकवाडीला नाशिकहून वेगळं पाणी सोडण्याची गरज भासणार नाही अशी शक्यता आता वर्तवली जातीय.
Continues below advertisement