Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा एका तरूणाची हत्या , अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Continues below advertisement

वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये सोशल मिडीयाचा गैरवापर कितपत कारणीभूत ठरतोय हे दाखवणारी एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आलीय.  अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी भर रस्त्यात संदीप आठवले या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येचं सोशल मीडिया हे कारण ठरलंय. मृत तरूण संदीपने काही दिवसांपूर्वी ओम खटकी या तरुणाला मारहाण केली होती. आणि या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. याचा राग मनात धरून ओम खटकीने आपल्या मित्रांच्या मदतीने संदीपची हत्या केलीय. हत्येनंतर ओम खटकीने गुन्हयाची कबुली देत इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याचं समोर आलं.तर दुसरीकडे नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाज कंटकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आलीये. तर या दगडफेकीत ७ ते ८ वाहनांचं नुकसान मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे आता नाशिकमध्ये पोलिसांचा गुन्हेगारांवरचा अंकुश कमी झालाय का असा सवाल सध्या उपस्थित झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram