Nashik Crime : विहीतगाव गावगुंडांकडून रस्त्यावरील 4 गाड्यांची कोयत्याने तोडफोड
नाशिक शहरातील गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. विहीतगाव परिसरात गावगुंडांनी 4 गाड्यांची कोयत्याने तोडफोड केली, तर एका अपार्टमेंच्या पार्किंगमधील 4 वाहनांची जाळपोळ करण्यात आली. मध्यरात्रीच्या घटनेने नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दहा दिवसांपूर्वी नाशिकच्याच सिडको परिसरात १६ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या नुकसान भरपाईचं काय, नाशिक शहरात पोलिसांचं अस्तित्व आहे का, असे प्रश्न नाशिकरांना पडलेत.