Nashik Crime : नाशिकमध्ये आजीच्या हत्येचं गूढ, आरोपीचा शोध सुरु
नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या सुरेखा बेलकरांच्या हत्येला चार दिवस उलटलेत.. मात्र अजूनही आरोपीचा शोध लागलेला नाही.. विशेष म्हणजे आजींना सुनबाईला कॉल करून नक्की काय सांगायचं होतं ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.. कारण सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार हत्या होण्याच्या काही तास आधी आजींनी सूनेला कॉल केला होता.. मात्र सुनेसोबत संपर्क होऊ शकला नव्हता. आरोपींचा शोध अद्याप लागलेला नसून पोलीस सर्व बाजूने सध्या तपास करत आहेत.. विशेष म्हणजे आजींच्या हातातील दोन अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याची माळही गायब असल्याने ही हत्या लूटमारीच्या उद्देशाने करण्यात आली का? असा प्रश्न आता उपस्थित होतेय..