Nashik Court | नाशिक जिल्हा कोर्टाच्या नव्या इमारतीला मान्यता, सध्याची जागा अपुरी पडत असल्यानं निर्णय | ABP Majha
नाशिक जिल्हा कोर्टाच्या नव्या ७ मजली इमारतीला मान्यता देण्यात आली असून त्यासाठी १७१ कोटींचा निधीदेखील मंजूर झालाय. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. सध्याची कोर्टाची जागा ही अपुरी पडत असल्यानं न्यायालयाच्या आवारातच नवीन इमारत बांधण्यात यावी अशी मागणी नाशिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली होती. नव्या इमारतीत ४४ विभाग असणार आहेत, तसंच पार्किंगसाठी वेगळी इमारत बांधण्यात येईल.