Nashik | नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे रस्त्यावर: बाजारपेठेत पायी पेट्रोलिंग
नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे रस्त्यावर उतरले असून त्यांनी स्वतः मुख्य बाजारपेठेत पायी पेट्रोलिंग सुरू केले आहे. मागील आठवड्यात नाशिकच्या सराफ बाजरातून सराफा व्यवसायिकांची 20 लाख रुपयांची रोकड लंपास झाली होती. त्यामुळे व्यासायिकामध्ये भितेचे वातावरण तर आहेच शिवाय मुख्य बाजार पेठेत प्रचंड गर्दी असल्यानं त्यावर नियंत्रण मिळणेही पोलिसांना कठीण जात आहे, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलीस आयुक्तांनी हाती दंडुका घेवून कर्मचाऱ्यां सोबत घेत व्यावसायिकांमध्ये विश्वास निर्माण करम्याच प्रयत्न केलाच शिवाय अनावश्यक गर्दी टाळण्याच नागरिकांना आवाहन केले.