CM Uddhav Thackeray | खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवू असं म्हणणं म्हणजे न्यायालयाचा आपमान : मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील संथ न्याप्रक्रियेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी न्यायालयाच्या संथ कामावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'सामान्य माणसांच्या मनातील भावना ओळखून वेळेत न्यायदान व्हायला हवं. सध्याच्या परिस्थितीत जलद न्याय देण्याची गरज आहे.'