Nashik Citylink Bus Rate : नाशकात बसप्रवास महागला, काय असणार सिटीलींकचे नवे दर ABP Majha
Nashik Citylink : नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलींकच्या (Citylink) शहर आणि सेवेची नवीन भाडेवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांना यापुढे अधिकचे तिकीट दर मोजावे लागणार असून शहरी भागांत दोन ते पाच रुपये तर ग्रामीण भागांसाठी सुमारे दहा रुपयांची भाडेवाढ झाली आहे. Company logo Ads by READ MORE आजपासून नाशिककरांचा (Nashik) प्रवास महागला असून नाशिक महानगरपालिकेनं (Nashik NMC) सुरू केलेली सिटीलिंक बससेवा गेल्या काही दिवसांपासून तोट्यात धावते आहे. हाच तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ करण्याचा निर्णय झाला. सरासरी सात टक्क्यांची दरवाढ होत असून प्रवाशांना दोन ते दहा रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या दिशेला कात्री लागणार आहे. त्यामुळे कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असलेली सिटी लिंक बस सेवा आता आर्थिक भुर्दंड देणारी बससेवा ठरते आहे.