Nashik : नाशिकमध्ये सिटी बस कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, 500 हून अधिक कर्मचारी संपावर
ऐन गणेशोत्सवात नाशिकमधली सिटी बससेवा ठप्प झालीय. नाशिकमधल्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यानं ही सेवा ठप्प झालीय. गेल्या ३ महिन्यापासूनचा पगार मिळाला नसल्यानं बस सेवेत असलेल्या ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलंय. वाहक आणि चालकांचा पगार वेळेवर द्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केलीय.....