Nashik Flight Service | उडान योजनेवर नाशिककर वैतागले, नाशकातील विमानसेवेवर प्रवासी नाराज | ABP Majha

Continues below advertisement
नाशिकहून उडान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विमानसेवेचा नाशिककरांना फायदा कमी आणि मनस्तापच जास्त झालाय. मंगळवारी नाशिकहून हैदराबादला जाणारं विमान ओझर विमानतळावरून तब्बल ३ तास उशिरानं उडालं. शिवाय विमानतळावर कुठलीच सुविधा नाही, पाण्यासाठी ३० रूपये मोजावे लागतात, हैदराबादला पोहोचल्यानंतर अर्धा-अर्धा तास विमानतळावरच सामानासाठी बसावं लागत असल्यानं नाशिककर वैतागलेत.
शिवाय आधीच मुंबई, पुणे, दिल्लीची सेवा बंद झाली आहे, आता केवळ अहमदाबाद आणि हैदराबादची विमानसेवा सुरू आहे, त्यासाठीही ५ तास लागत आहेत, मग उडान योजनेचा फायदा काय, असा सवाल नाशिककर विचारत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram