Nashik : कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्टी या रासायनिक पावडरपासून दूध बनवल्याचा धक्कादायक प्रकार
Continues below advertisement
Nashik : कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्टी या रासायनिक पावडरपासून दूध बनवल्याचा धक्कादायक प्रकार. आता एक धक्कादायक बातमी आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातून... तुम्ही रोज दूध पित असाल किंवा दुग्धजन्य पदार्थाचं सेवन करत असाल, ही बातमी आवर्जून पाहा. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये चक्क कॉस्टिक सोडा आणि मिल्की मिस्टी या रासायनिक पावडरपासून दूध बनवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू होता. काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी केंद्र चालक संतोष विठ्ठल हिंगे आणि प्रकाश विठ्ठल हिंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या गोदामात तब्बल ३०० गोण्या स्किम मिल्क पावडर, सात गोण्या कॉस्टिक सोडा आढळलाय.
Continues below advertisement