Sanjay Raut FIR : खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालाय. सरकारबाबत अप्रिय वक्तव्य करणे, या गुन्ह्य़ाअंतर्गत राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना, राज्यातलं सरकार बेकायदेशीर आहे असं राऊत म्हणाले होते. एवढंच नाही तर पोलिसांनी बेकायदेशीर सरकारच्या आदेशाचं पालन करू नये, असंही विधानी त्यांनी केलं होतं. दरम्यान, पोलीस किंवा जवानांना असं आवाहन करणं कायद्यानं गुन्हा आहे. भारतीय दंडात्मक विधिमधील कलम ५०५(१) हे कलम याबद्दल आहे. म्हणूनच राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement